महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youth Dirty Bath In Mohol : निषेध..! मोहोळ तहसील आवारात तरुणाने डबक्यात बसून घाण पाण्याने केली आंघोळ - तरुणाने डबक्यात बसून घाण पाण्याने केली आंघोळ

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या आवारात पावसामुळे पाण्याचे डबके झाले आहे; मात्र प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. याविरोधात आज नागेश बिराजदार या तरुणाने घाण पाण्याच्या डबक्यात बसून आंघोळ केली. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

Youth Dirty Bath In Mohol
घाण पाण्याने केली आंघोळ

By

Published : Jul 21, 2023, 4:48 PM IST

Updated : Jul 21, 2023, 6:22 PM IST

साचलेल्या पाण्यात बसून घाण पाण्याने आंघोळ करताना तरुण

सोलापूर :तहसीलदार, पोलीस अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी हे शासकीय वाहनांमध्ये बसून वाट काढत डबक्यातूनच कार्यालयात जात आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे. नागरिकांना मात्र डबक्यातून तारेवरची कसरत करत वाट काढावी लागत आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही किंवा साचलेलं पाणी जाण्यासाठी प्रशासन काहीही उपाययोजना करत नाही. याचा निषेध करण्यासाठी मोहोळ तहसील आवारात नागेश बिराजदार या तरुणाने बादली आणि मग आणून घाण पाण्याने डबक्यात बसून आंघोळ केली. यामुळे मोहोळ तहसीलदार कार्यालयात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

हलगी वाजवत डबक्यात केली आंघोळ :राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माेहोळ येथील शासकीय कार्यालयाच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने गणेश बिराजदार या तरुणाने चक्क रस्त्यावर ठिय्या मांडून साचलेल्या घाण पाण्याने आंघोळ केली. एवढेच नव्हे तर त्याने त्याच पाण्यात हलगीच्या कडकडाटात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही उरकला. मोहोळ तहसीलदार आवारात तरुण चक्क घाण पाण्यात बसून आंघोळ करत असल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला होता.

विविध तहसील कार्यालयासमोर तळे :मोहोळ तालुक्यातील तहसील कार्यालयाचा १०४ गावांशी संपर्क आहे. तसेच तहसील आवारात पोलीस ठाणे आहे. मोहोळ तहसील कचेरीच्या व पोलीस ठाण्याच्या आवारात असणाऱ्या सहा ते सात कार्यालयाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. मोहोळ तहसीलच्या आवारात पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. याबाबत प्रशासन कोणतीही कारवाई किंवा उपाययोजना करत नसल्याने वैतागलेल्या नागेश बिराजदार या तरुणाने तहसील कचेरीच्या आवारात साचलेल्या पाण्यात वृक्षारोपण करून चक्क आंघोळ करीत आंदोलन चालू केले आहे. मोहोळ तहसील परिसरात लक्षवेधी आंदोलनामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. सोलापूर जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालये आणि मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साचून अनेकदा वाहनांचा अपघात होतो. परिणामी, जखमी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Last Updated : Jul 21, 2023, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details