सोलापूर - राज्यात गणेश उत्सवाची धूम सर्वत्र पाहावयास मिळत आहेत. सर्वजण आपल्या परीने गणेश उत्सवाची तयारी करत आहेत. बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारात एका अवलिया अंध चित्रकाराने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाऊण एकर पडीक जमिनीवर पर्यावरण पूरक गणपती बाप्पांची मूर्ती साकारली आहे. पाऊण एकर पडीक जमिनीवर रांगोळी रंगांच्या माध्यमातून साकरलेली ही गणेशाची मूर्ती लक्ष वेधून घेत आहे.
पडीक जमिनीवर अंध चित्रकाराने साकारले बाप्पा, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश - Bappa was realized On the ground
बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारात एका अवलिया अंध चित्रकाराने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाऊण एकर पडीक जमिनीवर पर्यावरण पूरक गणपती बाप्पांची मूर्ती साकारली आहे. पाऊण एकर पडीक जमिनीवर रांगोळी रंगांच्या माध्यमातून साकरलेली ही गणेशाची मूर्ती लक्ष वेधून घेत आहे.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी पडीक जमिनीवर साकारले बाप्पा
आंध चित्रकार महेश मस्के हे आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाऊण एकरावर गणेशाची पर्यावरणपूरक अशी मूर्ती साकारली आहे. यामध्ये रांगोळीसह इतर साहित्यांचा वापर करून, आकर्षक अशी गणेशाची मूर्ती काढण्याचे काम महेश मस्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत केले आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी गणपती बाप्पा हे पर्यावरण पूरक असावे, असा संदेश चित्रकार महेश मस्के यांनी आपल्या कलेतून देण्याचा प्रयत्न केला आहे.