सोलापूर - देशभरात आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली. तिरंगी सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले आहे.
पंढरीचा राजा सजला 'तिरंग्यात', प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक सजावट
देशभरात आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली.
पुण्यातील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने दीड टन फुले देण्यात आली आहेत. झेंडू शेवंती आणि स्प्रिंगर या ३ फुलांच्या माध्यमातून ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिरात तिरंगा फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.
25 जानेवारी रोजी रात्रभर आरास करण्याचे काम पुणे येथील सचिन चव्हाण आणि मोरया ग्रुपच्या वतीने करण्यात आले. तिरंग्याने सजललेल्या या आरास कामासाठी झेंडुची फुले, तुळस, अष्टर यासह अन्य फुलांचा वापर केला आहे. या विविध फुलांमधून वेगवेगळा सुगंध दरवळत होता. रविवारी प्रजासत्ताक दिनी सुट्टी आल्याने मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. सध्या चंद्रभागा नदीपात्रात पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी या ठिकाणीही सकाळी भाविकांची गर्दी झाली आहे. विठु-रखुमाईला पहिल्यांदाच तिरंग्याने सजवलेल्या फुलांच्या आरासमध्ये पाहून भक्तांनाही देशभक्ती आणि विठ्ठल भक्तीचा दुहेरी संगम अनुभवता आला.