महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जय महाराष्ट्र'कडून तीनशे जणांना मोफत शिवभोजन थाळीचे वाटप, रुग्णांसाठी मुस्लीम तरुणांचीही सेवा - मोफत शिवभोजन थाळी

जय महाराष्ट्र मित्रमंडळ व शिवसेनेच्या वतीने करमाळ्यात शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. याकामासाठी येथील मुस्लीम युवकही साथ देत असून यातून सामाजिक एकोप्याचे आणि माणुसकीचे दर्शन घडत आहे.

शिवभोजन केंद्रावर श्रमदान करताना मुस्लीम तरुण
शिवभोजन केंद्रावर श्रमदान करताना मुस्लीम तरुण

By

Published : Apr 11, 2020, 1:50 PM IST

Updated : Apr 11, 2020, 6:48 PM IST

करमाळा (सोलापूर) - जय महाराष्ट्र मित्रमंडळ व शिवसेना यांच्या वतीने करमाळ्यात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीच्या उपक्रमातून गरजुंना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. या उपक्रमात श्रमदानासाठी मुस्लीम युवक स्वेच्छेने सहभागी होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता शहरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, बेघर निराधारांसह कष्टकरी वर्गातील गरजू ३०० भुकेलेल्यांना अन्न पोहोचवण्याचे काम करीत आहेत.

माहिती देताना शिवसेना शहरप्रमुख
जय महाराष्ट्र मित्रमंडळ व शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रविण कटारिया व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गरजूंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. या उपक्रमात शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण, नातेवाईक, बेघर व्यक्ती, भटके कष्टकरी वर्गातील मजूर, निवारा केंद्रात राहत असलेल्या व्यक्ती सेवेत असलेले सफाई कर्मचारी,आरोग्य खात्यातील कर्मचारी, पोलीस या सर्वांना गेल्या पंधरा दिवसांपासून शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अन्नाची पाकीटे तयार करण्यापासून ते सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम स्वेच्छेने शहरातील मुस्लिम समाजातील युवक आकीब सय्यद, अल्तमश सय्यद, युन्नूस मणेरी व शाकीर झारेकरी करीत आहेत. यातून सर्वजण माणुसकीचे दर्शन घडवत आहेत.
Last Updated : Apr 11, 2020, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details