सोलापूर- महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबरला निवडणूक झाली होती. त्यासाठी आज मतमोजणीला सुरूवात होणार असून निकालाची उत्सुकता शिगोला पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात झाली आहे.
विविध नेत्यांची पक्षांतरे आणि विविध बंडाळींमुळे अनेक ठिकाणी मोठी चुररस असल्याने निकालानंतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.