महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पंढरपुरात वारकऱ्यांची संख्या वाढली - etvbharat

गतवर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंगाची महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका विविध संघटनांनी घेतली होती. याचा परिणाम पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवर झाला होता.

यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली

By

Published : Jul 10, 2019, 8:40 PM IST

सोलापूर - मागील वर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठल महापूजा करू देण्यावरून वादळ उठले होते. विविध अफवा पसरवल्यामुळे भक्तांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याचा परिणाम पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवर झाला होता. अर्थातच अप्रत्यक्षपणे याचा फटका महाराष्ट्र परिवहन महामंळाच्या बसलाही बसला होता. मात्र, यावर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये कुठलीही आडकाठी आली नसल्यामुळे वारकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे मत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली

गतवर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंगाची महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका विविध संघटनांनी घेतली होती. त्यामुळे पंढरपूरमध्ये तणावाचे वातावरण होते. अशा पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने देखील प्रवाशांअभावी बसेस कमी प्रमाणात सोडल्या होत्या. परंतु यावर्षी तशी कोणतीही परिस्थीती नसल्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. पर्यायाने बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

जालना आगारहून 8 जुलैपासून पंढरपूरसाठी विशेष बस सोडण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार सोमवारी 9 बसेस, मंगळवारी 7 तर आज सायंकाळपर्यंत 6 बसेस सोडण्यात आल्या. यासोबत अंबर डेपोच्या 5 तर जळगाव डेपोच्या 22 बसेस आत्तापर्यंत पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. जालना डेपोतून बसगाड्यांची संख्या लक्षात घेता जळगाव डेपोची मदत घेतली जात आहे. 50 बस गाड्या या जालन्याहून पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details