सोलापूर -शहर महानगरपालिकेमध्ये सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने सूर्यग्रहण पाहता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील नागरिकांनी आणि खगोल प्रेमींनी मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेत सूर्यग्रहण पाहिले. तसेच सोलापूर शहराच्या महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनीही यावेळी सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेतला.
सोलापूर विज्ञान केंद्राकडून महानगरपालिकेत सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष सोय.... हेही वाचा... सूर्यग्रहण अन् अंधश्रद्धा : कर्नाटकातील या गावात दिव्यांगाना पुरतात जमिनीत
सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने सोलापूर महापालिकेमध्ये सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली. यावेळी सोलापूरच्या महिला महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनी पालिकेच्या आवारात दूर्बिणीमधून सूर्यग्रहण पाहिले. महापौरांसोबतच सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लूटला. 2019 या चालु वर्षीचे हे शेवटचे सूर्यग्रहण होते. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महापालिकेच्या आवारात नागरिकांना सूर्यग्रहण पाहण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
हेही वाचा... ...असे पार पडले या वर्षातील अखेरचे ग्रहण