सोलापूरएकनाथ शिंदे गटाकडून ( Eknath Shinde Group ) दादरमध्ये प्रति शिवसेना भवन ( Shiv Sena Bhavan ) उभारणार असल्याच नुकतच जाहीर झाले आहे.यावर जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी खोचक टोला सोलापूर दौऱ्यावर असताना लगावला आहे. मंदिर बांधायला निघाले आहेत. त्यामध्ये देव असणार का? कारण देव तर आगोदरच्या शिवसेना भवनात आहे असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा -Nude Photo Shoot Case रणवीर सिंगच्या घरी पोहचले पोलीस
सोलापुरातील एमआयएमचे ( MIM ) सात नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस ( Congress ) पक्षात प्रवेश करणार असल्याने जयंत पाटील सोलापूर येथे आले आहेत. विमानाने सोलापूर ( Solapur ) येथे प्रवेश करताच जयंत पाटील यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्ववर महाराज मंदिर ( Shivayogi Siddheshwar Maharaj Temple ) येथे जाऊन दर्शन घेतले.एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडून भाजपच्या जोरावर राज्यात सत्ता स्थापन केली आहे. ते महाराष्ट्रच्या जनतेला आवडलेलं नाही.एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता तर स्थापन केली ,मात्र मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांना तब्बल चाळीस दिवस लागले आहेत.आता चांगले मंत्रीपद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
हेही वाचा -Acharya Atre जयंतीनिमित्त जाणून घेऊयात आचार्य अत्रेंचा जीवन प्रवास