सोलापूर - बाबर हा मुस्लीम नसून गोडसे, गाडगीळ, दाते यांचे वंशज होते, असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे. सिंधुदुर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे अजब विधान केले होते. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समन्वय समितीचे समन्वयक मनोज उर्फ काकासाहेब कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
चंद्रकांत पाटलांची आमदारकी रद्द करा; समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितीची मागणी हेही वाचा -पशुवैद्यकीय डॉक्टर ठरविणार आता मादी किंवा नर पैदास, अकोल्यात यशस्वी प्रयोग
चंद्रकांत पाटीलमुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे
पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेत असताना संविधानाची शपथ घेतली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्याने धार्मिक तेढ निर्माण होऊन त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी तातडीने रद्द करावी, असेही कुलकर्णी यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
चंद्रकांत पाटलांची आमदारकी रद्द करा; समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितीची मागणी निवेदन देताना यांची उपस्थिती होती यावेळी ब्रम्हगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम डोनसळे, ब्राह्मण महासंघाचे उमेश काशीकर, ब्राह्मण महासंघाचे विनायक फलटणकर, निलेश देशपांडे, युवक जिल्हाअध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, पद्मजा टोळे, यदुनाथ देशपांडे, सुबोध देशपांडे, राधिका कुलकर्णी, सुनीता देशपांडे, गौरी आमडेकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा -पालघर : एकाच मंदिरात दोन गणेश मूर्ती, शिवपिंडींसह अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष