महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2020, 6:54 AM IST

ETV Bharat / state

'शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील'

सोलापुरातील आत्मा कार्यलयातील सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनाच्या या कार्यक्रमात कृषी उपसंचालक रवींद्र माने बोलत होते. कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

agriculture day celebration
कृषी दिन साजरा

सोलापूर - देशातील विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि उत्पन्नातील वाढ या त्रिसूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी दिली. सोलापुरातील आत्मा कार्यलयातील सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनाच्या या कार्यक्रमात कृषी उपसंचालक रवींद्र माने बोलत होते. कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अमृत सागर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकने, सदाफुले, कृषी विकास अधिकारी श्री. कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार यांच्या उपस्थिती मध्ये कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. कृषी संजीवनी सप्ताहामध्ये कृषी तंत्रज्ञान परिणामकारक होण्यासाठी प्रचार व जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन केले तर अमृत सागर यांनी जिल्हा खरीप हंगामामध्ये समाविष्ट केल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरीप पिकाच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन केले.

कृषी विभागाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण झाले. यावेळी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. मंजुनाथ पाटील, तंत्र अधिकारी श्री. माळी, कृषी अधिकारी श्री. नारायणकर, सचिन चव्हाण आदींसह शेतकरी, कृषी मित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले तर आभार दक्षिण तालुका कृषी अधिकारी वाघमोडे यांनी मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details