सोलापूर- सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि मुंबई सहकारी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे,अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
एमसीडीसी व मुंबई सहकारी संस्थेत सामंजस्य करार; शेती उत्पादनाची निर्माण होणार विक्री व्यवस्था
सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि मुंबई सहकारी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि अपना बाजार, सहकारी भांडार व कळवा सहकारी बाजार यांच्यात सांमजस्य करार हा मंत्रालयात मंगळवारी करण्यात आला आहे. राज्यातील विविध सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी बचत गट यांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादनांचे महामंडळामार्फत मार्केटिंग केले जात आहे. यापूर्वी पंजाब मार्केफेड येथे अशा संस्थासोबत सदर उत्पादने विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महाफार्म उत्पादनांमध्ये हळद पावडर, काजु पूर्ण, काजु तुकडा, कांदा लसुण मसाला, कोल्हापूरी मसाला, काळा मसाला, काळा मनुका इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. भविष्यात अजूनही जास्त उत्पादने बाजारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मिलींद आकरे, अपना बाजार संस्थेचे चेअरमन श्रीपाद पाठक, सहकारी भांडार या संस्थेचे चेअरमन संजय शेटे, कळवा बाजारचे एन.जी. गायकवाड उपस्थित होते.