महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीच्या स्थितीत प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची सूचना

राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. देशमुख म्हणाले, पूरजन्य परिस्थितीमुळे राज्यात घडणाऱ्या सर्व परिस्थितीवर २४ तास देखरेख ठेवण्यात येत असून त्यामध्ये नदीची पाणीपातळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग याबाबत आढावा घेण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची सूचना

By

Published : Aug 6, 2019, 9:59 AM IST

सोलापूर- भारतीय हवामान विभागाकडून दिलेला अंदाज लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. देशमुख म्हणाले, पूरजन्य परिस्थितीमुळे राज्यात घडणाऱ्या सर्व परिस्थितीवर २४ तास देखरेख ठेवण्यात येत असून त्यामध्ये नदीची पाणीपातळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग याबाबत आढावा घेण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तिथे एनडीआरएफसोबत SDRF ची मदत घेण्यात येत आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. असे सांगून सुभाष देशमुख यांनी मंत्रालयात राज्यातील सर्व जिल्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details