सोलापूर: युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे ( Yuva Sena chief Aditya Thackeray ) हे सांगोला येथे जाण्यापूर्वी सोलापुरात माध्यमांना माहिती दिली. खोके म्हटल्यावर यांना का राग येत आहे. त्यांनीच जाहीर केले पाहिजे, खोके म्हणजे काय? असे आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार मधील शिंदे गटाला ( shinde group ) टोला लगावला आहे. परतीच्या पावसाने राज्यात थैमान मांडले आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कृषी मंत्री कुठे गायब झाले आहेत. कुणालाही माहिती नाही, तसेच उद्योग मंत्री कुठे आहेत. त्याबाबत जनतेला काहीही माहिती नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सांगोला येथे जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेल मध्ये बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माहिती दिली.
Aditya Thackeray : खोके म्हटल्यावर त्यांना का झोंबल जातेय खटला भरणाऱ्यांनी करावे स्पष्ट - आदित्य ठाकरे
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे ( Yuva Sena chief Aditya Thackeray ) हे सांगोला येथे जाण्यापूर्वी सोलापुरात माध्यमांना माहिती दिली. खोके म्हटल्यावर यांना का राग येत आहे. आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार मधील शिंदे गटाला ( shinde group ) टोला लगावला आहे.
सोलापुरात आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत :युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरें सांगोला येथे जाताना सोलापुरात कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. बालाजी ससरोवर येथे आदित्य ठाकरेंचे शिवसेना व युवा सेनेच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. माध्यमांना माहिती देताना त्यांनी पुन्हा एकदा खोके सरकार म्हटले आहे. खोके म्हटल्यावर शिंदे गट,मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा प्रश्न विचारताच आदित्य ठाकरेंनी, त्यावर उत्तर दिले. खोके म्हटल्यावर त्यांना झोंबल जात आहे. त्यांनी स्पष्ट करावे, खोके म्हणजे काय? असे आदित्य ठाकरे म्हणाले.