सोलापूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापुरात ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तो भाग प्रतिबंधीत म्हणजेच सील करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिबंधीत क्षेत्रात फिरणाऱ्या 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली आहे.
सोलापूर : शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई - सदर बझार पोलीस ठाणे
सोलापूर शहरातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिबंधीत क्षेत्रात फिरणाऱ्या 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तालय सोलापूर
सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिबंधीत क्षेत्रात 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिबंधीत क्षेत्रात एक गुन्हा दाखल झाला असून एकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे तर जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा दाखल झाला असून दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -करमाळ्यात उत्तरेश्वर पेट्रोलियमच्या वतीने 501 कुटूंबाना किराणा किट