सोलापूर : पांगरी पोलीस ठाण्यात तीस हजारांची लाच घेताना अटक केले. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याच्या आवारात सोलापूर एसीबीने 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पांगरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यास अटक केली आहे. त्याचबरोबर पांगरी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी व बाहेर बाजूस असलेल्या एका कँटीन चालकास अटक केली आहे. एसीबीच्या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
लाच स्वीकारण्याची कँटीनचालकाचा वापर :पांगरी पोलीस ठाण्यात लाच स्वीकारण्याची नवी शक्कल समोर आली आहे. पोलीस ठाण्यात जाऊन तडजोड करून लाच देण्याची रक्कम ठरवली जात होती. पीडित किंवा तक्रादार व्यक्तीना बाहेरील कँटीनमध्ये लाचेची रक्कम द्यावी लागत होती. अँटी करप्शन सोलापूर विभागाने पोलिसांचा हा डाव हाणून पाडला आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड, कँटीन चालक हसन इस्माईल सय्यद या तिघांवर एसीबीने 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
एसीबी सोलापूर कार्यालयकडे तक्रार प्राप्त झाली होती :तक्रारदार व त्यांच्या भावाविरुध्द पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्हयात तक्रारदार व त्यांचा भाऊ या दोघांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला होता. सदर गुन्हयात तक्रारदार तसेच त्याच्या भावाला नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्याकरीता गुन्हयाचे तपास अधिकारी एपीआय नागनाथ खुणे व त्यांचे दप्तरी कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी 15 हजार रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच रक्कम पोलीस स्टेशन बाहेरील कँटीन चालक हसन सय्यद यांकडे देण्यास सांगितले होते.