सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजा करण्याचा मान लातूरमधील अहमदपूरच्या विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण या दाम्पत्याला मिळाला. या दाम्पत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना वर्षभरासाठी मोफत एसटी बस प्रवासाचा मोफत पासही देण्यात आला.
आषाढी एकादशी : विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळालेल्या चव्हाण दाम्पंत्याला वर्षभरासाठी मोफत एसटी पास - cm
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजा करण्याचा मान लातूरमधील अहमदपूरच्या विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण या दाम्पत्याला मिळाला.
चव्हाण दाम्पंत्याला वर्षभरासाठी मोफत एसटी पास
चव्हाण दाम्पत्यांने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याची माहिती दिली. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान मिळाल्याने खूप आनंद झाल्याचे चव्हाण दाम्पंत्याने यावेळी सांगितले. विठ्ठल रुख्मिणी मंदीर समितीच्या वतीने चव्हाण दाम्पंत्यासाठी वर्षभरासाठी मोफत एसटी महामंडळाचा पास देण्यात आला.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला आहे.