महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज सोलापुरात 8 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, एकाचा मृत्यू

आज सोलापुरात 8 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून एका 57 वर्षीय सहायक पोलीस फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सोलापुरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 153 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 6, 2020, 9:20 PM IST

सोलापूर - आज सोलापुरात 8 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून एका 57 वर्षीय सहायक पोलीस फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सोलापुरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 153 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

माहिती देताना विभागीय आयुक्त

सोलापुरातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे विभागाचे महसूल आयूक्त मिलिंद म्हैसेकर हे सोलापुरात आले होते. सोलापुरातील एकता नगर भागात राहणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज सोलापुरातील एकता नगर भागात राहणाऱ्या एका सहायक पोलीस फौजदाचा मृत्यू झाला आहे. आज एका दिवासात आठ रूग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे.

आजपर्यंत 2 हजार 633 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यापैकी 2 हजार 369 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2 हजार 216 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 153 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी 264 अहवाल प्रतीक्षेत आहेत.

आज 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून हे सर्व पुरुष आहेत. यात सदर बाजार परिसरातील 2, मोदी परिसरात 2 तर साईबाबा चौक 1, एकता नगर 1, राहुल गांधी झोपडपट्टीत 1 तर सिद्धेश्वर पेठ परिसरातील 1 आहे. आज 197 अहवाल प्राप्त झाले असून यात 189 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 8 पॉझिटिव्ह आले.

सोलापुरातील कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त महसूल डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सोलापुरात येऊन प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शहरात एकुण 39 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या विभागात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचे संक्रमण कुठून सुरु झाला याचा शोधही सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार रुग्णालयातून याचे संक्रमण सुरू झाले असावे, असेही विभागीय आयुक्तांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

हेही वाचा -शासनासोबत चर्चा करुनच आषाढी वारी - सोहळा प्रमुख

ABOUT THE AUTHOR

...view details