पंढरपूर -सोलापूर जिल्ह्यातील 778 जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील 6 हजार 814 तर ग्रामीण भागातील 16 हजार 846 अशा 23 हजार 660 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
दिलासदायक : सोलापूर जिल्ह्यात एकच दिवसात 778 कोरोना मुक्त - undefined
सोलापूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 31 हजार 812 झाली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील 23 हजार 561 तर महापालिका हद्दीतील 8 हजार 251 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 31 हजार 812 झाली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील 23 हजार 561 तर महापालिका हद्दीतील 8 हजार 251 जणांचा समावेश आहे. तर एका दिवसात सोलापूर ग्रामीण भागातील 12 आणि महानगरपालिका हद्दीतील एक अशा 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 1 हजार 112 झाली आहे.
तर एका दिवसात ग्रामीण भागातील 645 तर महापालिका हद्दीतील 467 कोरोनाबधित आढळून आले आहेत. कोरोना चाचणीचे 109 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. रुग्णालयात सध्या 7 हजार 40 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 6 हजार 70 तर महापालिका हद्दीतील 970 रुग्णांचा समावेश आहे.
TAGGED:
1