महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 10, 2019, 11:32 PM IST

ETV Bharat / state

सांगलीतल्या पुरग्रस्त महिलांसाठी पंढरपुरातून रुक्मिणी मातेच्या साड्यांची मदत...

रुक्मिणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या साड्या या पूरग्रस्त महिलांना देण्यात येणार आहेत. ५००० साड्यांचा टेम्पो आज (शनिवार) सांगलीला पाठवण्यात आला आहे.

सांगलीतल्या पुरग्रस्त महिलांसाठी पंढरपुरातून रुक्मिणी मातेच्या साड्यांची मदत

सोलापुर -सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांसाठी पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला अर्पण झालेल्या 5000 साड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे.

सांगलीतल्या पुरग्रस्त महिलांसाठी पंढरपुरातून रुक्मिणी मातेच्या साड्यांची मदत
याबाबत समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर सर्व सदस्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार सदर साड्यांचा टेम्पो आज (शनिवार) सांगलीला मार्गस्थ झाला आहे. यावेळी मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details