सोलापूर- आज वटपौर्णिमेचे औचित्य साधत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात डाळिंबाची सजावट करण्यात आली. डाळिंबाची ही सजावट पुणे येथील भाविक राजाभाऊ भुजबळ व राहुल ताम्हाणे यांनी केली आहे. यासाठी तब्बल ५ हजार डाळींबांचा वापर करण्यात आला आहे.
वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला ५ हजार डाळींबाची आरास - ५ हजार
विठुरायासाठी सजविण्यात आलेली डाळींबाची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती
डाळींबाच्या आरासाने सजवलेली विठूरायाची मूर्ती
श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, सभामंडप सर्व डाळींबांने सजविण्यात आले होते. विठुरायासाठी सजविण्यात आलेली डाळींबाची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तर आज वटपौर्णिमा निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.