सोलापूर - पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि बसच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. यात २ जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमधील सर्वजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पंढरपूर-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात ५ ठार - भीषण
मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.

भीषण अपघात
मुंबईहून निघालेली (एमएच ०३ एझेड ३११६) क्रमांकाची कार बसला धडकली. राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस पंढरपूरहून सोलापूरकडे जात होती. अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.