सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज दिवसभरामध्ये तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33 वर गेली आहे. त्यापैकी तीन मृत असून, उर्वरित 30 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापुरात आणखी 3 व्यक्तींना कोरोनाची लागण; एकूण रुग्णांची संख्या 33 वर
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण भारतरत्न इंदिरानगरमधील असून एक रुग्ण शिवगंगा नगरामधील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापुरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता 23 तारखेपर्यंत सोलापुरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
सोलापूरात आणखी 3 व्यक्तींना कोरोनाची लागण; एकूण रुग्णांची संख्या 33 वर
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण भारतरत्न इंदिरानगरमधील असून एक रुग्ण शिवगंगा नगरामधील आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापुरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता 23 तारखेपर्यंत सोलापुरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तीन दिवस दूध वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदीचे पालन करण्यात येत आहे. सर्वत्र रस्ते सामसूम होते.