सोलापूर - आज आणखी 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा हा 364 वर गेला असून त्यापैकी 150 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी 7 वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 364 झाली आहे. आज एका दिवसात 234 अहवाल प्राप्त झाले, त्यात 213 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 9 पुरुष, 12 महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मृतांची संख्या 24 आहे.
एकूण कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 4106 असून त्यातील 3820 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3456 निगेटिव्ह तर 364 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. अद्याप 286 अहवाल येणे आहेत. आज बरे झालेल्यांपैकी 37 जणांना घरी सोडण्यात आले. ही एकूण संख्या आता 150 इतकी झाली आहे तर रुग्णालयात अद्याप 190 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज या भागातील रुग्ण पॉझिटिव्ह -
शुक्रवार पेठ 1 पुरुष
अशोक चौक 1 पुरुष, 1 महिला
जुना कुंभारी नाका 1 पुरुष, 1 महिला
अलकुंटे चौक 1 पुरूष