माढ्यात पाच अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य, २ जणांवर गुन्हा दाखल - madha crime latest news
स्वप्निल पांडुरंग शिंदे आणि इतर एक जणाने ५ अल्पवयीन मुलांना बळजबरीने त्यांच्या घरी नेवुन ११ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ४ च्या पूर्वी व १४ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ६.३० च्या वेळेस लैंगिक हेतूने अनैसर्गिक कृत्य केले. गावातील इतर मुलांवर देखील अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.
माढा (सोलापूर) -५ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासह स्वप्निल पांडुरंग शिंदे (रा.महातपूर, ता.माढा) या दोघांवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार माढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडित ५ अल्पवयीन मुलापैकी एका मुलाच्या ६५ वर्षीय आजोबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दोघा आरोपीनीं ८ ते १० वयोगटातील ५ अल्पवयीन मुलांना बळजबरीने त्यांच्या घरी नेवुन ११ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ४ च्या पूर्वी व १४ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ६.३० च्या वेळेस लैंगिक हेतूने अनैसर्गिक कृत्य केले. गावातील इतर मुलांवर देखील अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलास समज देऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वाधिन करण्यात आले. स्वप्नील पांडुरंग शिंदे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे अधिक तपास करत आहेत.