सोलापूर- बोरामणी जिल्हापरिषद गटातील १४ गावातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत वंचित बहुजन आघडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगे येथे रविवारी बोरामणी जिल्हापरिषद गटातील १४ गावातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
माजी सभापती नळपती बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे माजी संचालक डी. एन. गायकवाड, वरळेगावचे माजी सरपंच भिमा माने, उळ्याचे प्रशांत गायकवाड, प्रा. सिद्धार्थ तडसरे, सरपंच पुंडलीक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.