सोलापूर - शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज एका दिवसात तब्बल 13 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 81 झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये 4 पुरूष व 9 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापुरात आज आणखी 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण आक़डा 81 - news about corona virus
सोलापुरात आज एका दिवसात 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81 झाली आहे.
सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आज 13 ने वाढून 81 झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली आहे. आज दिवसभरात 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 104 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत तर 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातून आतापर्यंत 1624 जणांची चाचणी करण्यात आली आहे. यातील 1250 जणांचे अहवाल प्राप्त झालेत. यापैकी 1169 निगेटिव्ह तर 81 पॉझिटिव्ह आहेत. या 81 पैकी 6 जणांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज एकूण 13 नवीन रुग्ण मिळाले यात 4 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. यातील सदर बाजार लष्कर येथील 3 महिला, सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील 1 महिला, आंबेडकर नगर माऊली चौक येथील 1 महिला, शामा नगर सात रस्ता येथील 1 महिला, मार्कंडेयनगर कुमठा नाका येथील 1 महिला , शास्त्रीनगर येथील 1 महिला एमआयडीसी ताई चौक येथील 1 महिला, शनिवार पेठ -पाच्छापेठ परिसरातील 1पुरुष , आणी इंदिरानगर येथील 3 पुरुष यांचा समावेश आहे.