महाराष्ट्र

maharashtra

सोलापुरात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढले, एकाचा काढला डोळा

By

Published : May 21, 2021, 9:13 PM IST

सोलापुरात कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. सोलापुरात म्यूकरमायकोसिस रुग्णांची संख्या 155 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत 3 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर 27 रुग्ण बरे झाले आहेत.

solapur
सोलापूर

सोलापूर - कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. त्यात आता म्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) आजाराने थैमान घातले आहे. सोलापुरात बुधवारपर्यंत म्यूकरमायकोसिस रुग्णांची संख्या 90 होती. ती संख्या गुरुवारी 155 पर्यंत पोहोचली आहे. आजपर्यंत सोलापुरात 3 रुग्णांचा मृत्यू म्यूकरमायकोसिसमुळे झाला आहे. तर 27 रुग्ण यामधून बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, या आजारामुळे एका रुग्णाला डोळा काढावा लागला आहे.

सोलापुरात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढले, एकाचा काढला डोळा

जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय तज्ज्ञांच्या बैठका सुरू

काल सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्हा आरोग्य विषयावर बैठक बोलावली होती. तसेच शहरातील कान, नाक घसा तज्ज्ञ डॉक्टरांनादेखील बैठकीत बोलावण्यात आले होते. आजही दिवसभर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या बैठका झाल्या. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे.

आधी रेमडेसिवीरसाठी आता म्यूकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी धावपळ

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मोठी कसरत करावी लागली. ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांना आता म्यूकरमायकोसिसची लागण होत आहे. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन नंतर आता काळ्या बुरशीवरील इंजेक्शनचा पुरवठा स्वतः कडे घेतला आहे. जेणेकरून याचा काळाबाजार होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

काळ्या बुरशीवरील रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये नवीन वॉर्ड

म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी नवीन वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कान, नाक, घसा, डोळ्यांच्या डॉक्टरांची टीम नेमण्यात आली आहे.

म्यूकरमायकोसिसमुळे डोळा काढला

सोलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनावर मात करून परत गेलेल्या जाधव नावाच्या रुग्णाला म्यूकरमायकोसिसची लागण झाली. त्याच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजाराची सुरुवात नाकातून झाली. दोनच दिवसांपूर्वी त्याचा डोळा काढण्यात आला आहे. जाधव यांचा मुलगा म्यूकरमायकोसिसवरील इंजेक्शनसाठी भटकत होता. डॉक्टरांनी त्याला 20 किंवा 30 इंजेक्शन लवकर उपलब्ध करा, असा सल्ला दिला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक घेतला. जिल्हा प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करून त्याला वेळेवर इंजेक्शन मिळवून देऊ, अशी माहिती या कक्षातील प्रमुख मनीष काळजे यांनी दिली आहे.

हेही वाचा -नागपुरात लवकरच सुरू होणार लहान मुलांवर कोरोना लसीकरणाचे ट्रायल

ABOUT THE AUTHOR

...view details