सोलापूर- शहरात आणखी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता 12 झाली असून यातील एकाचा तीन दिवसापूर्वीच मृत्यू झालेला आहे. सध्या सोलापूर शहरात कोरोनाचे एकूण 11 जण पॉझिटीव्ह असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घरातच राहा..! सोलापुरात आणखी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह - सोलापूर कोरोना न्यूज
शहरातील पाच्छा पेठ भागातील महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 42 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 10 जण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
शहरातील पाच्छा पेठ भागातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 42 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 10 जण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. जी महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्या महिलेच्या संपर्कातील 9 व्यक्ती आहेत. तर मृत व्यक्तीच्या संपर्कातील 1 जण आहे. एका दिवसात सोलापूरात 10 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे सोलापूरकरांचे टेंशन वाढले आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापूरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. हे सर्व कोरोना बाधित सोलापूर शहरातील पाच्छा पेठ भागातील आहेत. या सर्व परिसर सील करण्यात आलेला आहे. सोलापुरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लोकांनी घरातच रहावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.