महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार्शीत 10 दिवसांचे लॉकडाऊन, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय - corona news

सध्या संचारबंदी लागू असली तरी नागरिकांनी नियम धाब्यावर ठेवलेले आहेत. त्यामुळे आता कडक लॉकडाऊलन करण्याच्या तयारीत प्रशासन आहे.

बार्शीत 10 दिवसाचे लॉकडाऊन, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय
बार्शीत 10 दिवसाचे लॉकडाऊन, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय

By

Published : Apr 20, 2021, 5:08 PM IST

बार्शी -वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी बार्शी तालुक्यात बुधवारपासून दहा दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून घेण्यात येत असून प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे बार्शी तालुक्यात आढळून येत आहेत. तालुक्यामध्ये सध्या संचारबंदी लागू असली नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचे वाढते प्रमाण नियंत्रणात येऊ शकलेले नाही. वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन केला जाणार असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

बार्शीत 10 दिवसांचे लॉकडाऊन, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय

कोरोनाचे वाढते प्रमाण प्रशासनासह लोकप्रतिनिधींसाठी डोकेदुखी-

सकाळच्या सत्रात दूध विक्रीला परवानगी आणि मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या हालचाली प्रशासन स्थरावर सुरू आहेत. यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संवाद साधून रूपरेषा आखली आहे. यास प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी दुजोरा दिला असून आहे. वैरागमध्ये खाजगी डॉक्टर्सनी सुरू केलेल्या संतनाथ कोविंड सेंटरची पाहणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रातही आढावा घेतला. तालुक्यामध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण प्रशासनासह लोकप्रतिनिधींसाठी डोकेदुखी ठरत आहे. असे असले तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदारीने आपली भूमिका पार पाडत आहेत.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, माजी जि.प.सदस्य संतोष दादा निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, वैराग ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.जयवंत गुंड, वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहीर उपस्थित होते.

हेही वाचा-काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details