सिंधुदुर्ग- संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, यांत्रिकी विभागाचे अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे स्वीय्य सहायक या तिघांना कारवाईची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी बजावली आहे. तिघेही जिल्ह्याबाहेर गेले होते. तर लघु पाटबंधारे विभागाचे दोन अधिकारीही जिल्ह्याबाहेर जाऊन आल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
संचारबंदीचे उल्लंघन भोवले; परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर गेलेल्या तीन अधिकाऱ्यांना नोटीस
जिल्ह्याबाहेर गेलेले हे अधिकारी कोल्हापूर, सांगली, पुणे या हायरिक्स असलेल्या जिल्ह्यात जाऊन आल्याचीही धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आणखी दोन अधिकारीही संचारबंदी मोडत जिल्ह्याबाहेर गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. जिल्ह्याबाहेर गेलेले हे अधिकारी कोल्हापूर, सांगली, पुणे या हायरिक्स असलेल्या जिल्ह्यात जाऊन आल्याचीही धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी 3 मेपर्यंत देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींशिवाय कोणालाच प्रवेश नाही, किंवा जाण्यास परवानगी नाही. असे असतानाही काही अधिकारी जिल्ह्याबाहेर गेले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य नागरिक संचारबंदी पाळत असतील, तर अधिकारी का पाळत नाहीत ? असा सवाल उपस्थित करत काही नागरिकांनी केला होता. त्यानंतर संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.