सिंधुदुर्ग -जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला वन्य प्राण्याची शिकार व अवयवांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. कासार्डे ते पडेल कॅन्टीन जाणारे रस्त्यावर गाव दारुम येथून होंडा शाईन मोटार सायकल वर दोघे बिबटया या प्राण्याचे कातडे घेऊन येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी सापळा रचत वेगवेगळ्या ठिकाणी पथके ठेवली होती. अखेर दारुम, माळवाडी येथे दोन आरोपी मोटरसायकलवरुन बिबट्या या वन्य प्राण्यांचे कातडे शनिवारी१४ मे रोजी घेऊन जात असताना आढळले. तब्बल ८ लाख किंमतीचे हे कातडे असल्याने खळबळ उडाली आहे.
बिबट्याचे कातडे घेऊन जाणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात - बिबट्याचे कातडे घेऊन जाणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिधुदुर्ग पोलीसांना दिलेले होते . त्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षकनितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी खालीलप्रमाणे सापळा रचून वन्य प्राण्याचे कातडे हस्तगत करुन तस्करी रोखण्यात यश मिळविलेले आहे.
वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन व पोलीस विभाग प्रयत्नशील - शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. जिल्हयाचे पर्यटनदृष्टया महत्व वाढलेले आहे. जिल्ह्यामध्ये वनक्षेत्राची वाढ होवून वन्यप्राणी सुरक्षित रहावे या करता शासनाच्या संबंधित विभागामार्फत सतत प्रयत्न सुरू आहेत. परंतु काही समाज विघातक व्यक्ती स्वतःच्या आर्थिक लाभासाठी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस व इतर अवयवांची बेकायदेशीरपणे विक्री करतात. वन्य प्राण्याची शिकार व अवयवांची बेकायदेशीर विक्री होऊ नये याकरता वन व पोलीस विभाग प्रयत्नशील आहे.
तस्करी रोखण्यात यश - सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिधुदुर्ग पोलीसांना दिलेले होते . त्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षकनितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी खालीलप्रमाणे सापळा रचून वन्य प्राण्याचे कातडे हस्तगत करुन तस्करी रोखण्यात यश मिळविलेले आहे.
दोघांना घेतले ताब्यात - पोलीस पथकात कासार्डे ते पडेल कॅन्टीग जाणाऱ्या रोडवर दारुम , माळवाडी येथे सापळा लावला त्यात दोन व्यक्ती एका काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटार सायकलवरून येताना दिसले. त्यांना थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता किलतानाच्या पिशवीची त्यामध्ये ८ लाख रुपये किमतीचे एक बिबटया या वन्य प्राण्याचे कातडे मिळून आले. त्याबाबत रितसर कायदेशिर कार्यवाही करून दोघांना त्यांच्याकडील मोटार सायकलसह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता वन परिक्षेत्र अधिकारी , कणकवली यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
कारवाईमध्ये यांचा होता सहभाग -ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग ,पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके , पोलीस कॉन्स्टेबल सुधिर सावंत , अनिल धुरी, कृष्णा केसरकर, पोलीस नाईक किरण देसाई, संकेत खाडये, अमित तेली यांनी केली.