महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प - भुईबावडा घाट

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपाळीवर सुरू आहे. गगनबावडा घाटात दरड कोसळण्याची या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, घाट रस्ता बंद झाल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By

Published : Sep 4, 2019, 5:51 PM IST

सिंधुदुर्ग- येथे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळली. पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा हा राज्यमार्ग आहे. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांचा यामुळे खोळंबा झाला आहे.

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

हेही वाचा-सिंधुदुर्गात दोडामार्गतील धामणा धरणाला मोठी गळती; दोडामार्गसह गोव्यातील दोन तालुक्यांना पुराची भीती?

दरम्यान, या मार्गावरील वाहतूक सध्या करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपाळीवर सुरू आहे. गगनबावडा घाटात दरड कोसळण्याची या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, घाट रस्ता बंद झाल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details