सिंधुदुर्ग- आंबोलीत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे आंबोलीतील वर्षा पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेला घाटातील धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. मात्र, कोरोनामुळे या धबधब्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत.
सिंधुदुर्गातील पर्यटनाचे आकर्षण असलेला आंबोली धबधबा प्रवाहित - amboli waterfall
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन बंद आहे. आंबोलीचा मुख्य पर्यटन हंगाम समजल्या जाणाऱ्या वर्षा पर्यटन हंगामासाठी कितपत पर्यटक येतील याबाबत येथील पर्यटन व्यवसाय चिंतातुर आहेत. जर यंदा पर्यटन झाले नाही तर येथील पर्यटन व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
पुढचे चार दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर हा धबधबा पूर्णक्षमतेने प्रवाहित होईल, असे येथील पर्यटन व्यावसायिक काका भिसे यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन बंद आहे. आंबोलीचा मुख्य पर्यटन हंगाम समजल्या जाणाऱ्या वर्षा पर्यटन हंगामासाठी कितपत पर्यटक येतील याबाबत येथील पर्यटन व्यवसाय चिंतातूर आहेत. जर यंदा पर्यटन झाले नाही तर येथील पर्यटन व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय चालण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेला व्यावसायिक जगण्यासाठी निदान जिल्हा अंतर्गत व ग्रीन झोन मधील जिल्ह्यातील पर्यटकांना पर्यटनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी काका भिसे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील वर्षा पर्यटन गेल्यावर्षीही अति पर्जन्यवृष्टीमुळे अडचणीत आले होते. त्यानंतर दिवाळी व क्रिसमस पर्यटन हंगामामध्ये काही दिवस येथील पर्यटन व्यवसायिकांनी व्यवसाय केला. त्यानंतर लगेचच कोरोनामुळे येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. मे महिना हा सुद्धा येथील मुख्य पर्यटन हंगाम असतो, तोही होऊ शकला नाही.