सिंधुदुर्ग- दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जात आहे. शनिवारी एकाच दिवशी 8 रुग्ण सापडल्यानंतर आज (रविवार) पुन्हा एक रुग्ण सापडला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 17 झाली आहे.
सिंधुदुर्गात आज आणखी एका कोरोनाग्रस्ताची नोंद, एकूण संख्या 17 वर - sindudurg latest news
दिवसेंदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जात आहे. शनिवारी एकाच दिवशी 8 रुग्ण सापडल्यानंतर आज (रविवार) पुन्हा एक रुग्ण सापडला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात आज आणखी एका कोरोनाग्रस्ताची नोंद
आज सापलेला कोरोनाबाधित रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे. ही 52 वर्षीय महिला आहे. 17 मे रोजी सदर महिला मुंबई येथून जिल्ह्यात आली. 20 मे रोजी तिचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. आज तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णसंख्या 17 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. सदर महिला आल्यापासून अलगिकरनात होती, असेही त्यांनी सांगितले आहे.