पणजी - गोव्यात अखेर टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारनें प्रतिकिलोमीटर 3 रुपये अशी अतिरिक्त दरवाढ निश्चित केली आहे.
मागच्या काही महिन्यांपासून राज्यात टॅक्सी भाडे दरवाढीच्या मागणीसाठी विविध टॅक्सी चालक संघटनांनी राज्य सरकार विरोधात आंदोलने केली. गोवा माईल्स प्रणाली बंद करण्याचीही मागणी या संघटनांनी सरकारकडे केली. ऐन कोविडची दुसरी लाट जोमात असताना या संघटनांनी पणजीतील आझाद मैदानात आपल्या कुटुंबियांसह आंदोलन केले. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहून गोवा माईल्स प्रणाली न हटविणार असल्याची भूमिका सरकारने घेतली होती. अखेर सरकारने टॅक्सी भाड्यात प्रतिकिलोमीटर 3 रुपये अशी अतिरिक्त दरवाढ निश्चित केली आहे.
डिजिटल मीटर न बसवल्यास टॅक्सीचा परवाना रद्द - वाहतूक मंत्री
उच्च न्यायालयाने सर्वच टॅक्सी चालकांना डिजिटल मीटर बंधनकारक केले आहेत. राज्यात डिजिटल मीटर बसवण्यास टॅक्सी चालकांचा विरोध होता. मात्र वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास वाहतूक टॅक्सी धारकांचा परवाना रद्द करणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे राज्यात डिजिटल मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गोवा माईल्स प्रणाली हटविण्याची टॅक्सी चालकांची मागणी
राज्यात अनेक देशी-विदेशी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मात्र टॅक्सी चालक आपल्या मर्जीनेच त्यांच्याकडून भाडेवसुली करतात. याविषयी अनेक तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या. यानंतर सरकारने गोवा माईल्स प्रणाली विकसित करून त्यानुसार या टॅक्सी चालकांना भाडे आकारण्यास सांगितले होते. मात्र अनेक टॅक्सी चालकांनी यास विरोध करत आंदोलन करून ही प्रणाली हटविण्याची मागणी केली. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहत कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्स प्रणाली हटविणार नसल्याचं सांगण्यात आले होते.
अतिरिक्त लुटमारीला बसणार आळा