सिंधुदुर्ग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात संचारबंदीचे उल्लघन करणाऱ्यांची गय करू नका, असे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग दौरा केला. यावेळी सामंत यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची गय नको - पालकमंत्री उदय सामंत - Take action against violation artical 144
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग दौरा केला. यावेळी सामंत यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी सामंत यांनी अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या.
पालकमंत्री उदय सामंत
यावेळी सामंत यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. तसेच दोडामार्ग मधील परिस्थिती जानून घेतली. संचारबंदीचे जिल्ह्यात काटेकोर पालन होत असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या काळात ९९ % लोक घरात आहेत. मात्र, १ % लोकांमुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. संचारबंदीचे उल्लंघन केलेल्यावंर कडक कारवाई करावी. तसेच ज्यांची वाहणे जप्त करण्यात आली आहेत ती 3 मे लाॅकडाऊन संपेपर्यंत मालकांना देऊ नयेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.