महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण? - Nitesh Rane in Kankavali constituency

कोकणातील लढत म्हटले की सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात नारायण राणे. परंतु त्यांच्या अगोदरही एक राणे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते ते म्हणजे दिवंगत अमृतराव राणे. अमृतराव यांचे चिरंजीव सुशिल राणे आता कणकवलीतून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या मतदार संघात राणे विरूद्ध राणे सामना रंगणार आहे.

कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण?

By

Published : Oct 8, 2019, 2:54 PM IST

सिंधुदुर्ग - नारायण राणेंनीकाँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर कणकवली विधानसभा मतदार संघात त्यांचे चिरंजीव नितेश राणे भाजपचे उमेदवार असणार आहेत. तर नितेश राणे यांच्या विरोधात राणेंचेच एकेकाळचे कट्टर समर्थक असलेले सतीश सावंत हे मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने राणेंविरोधात राणेंनाच मैदानात उतरवले आहे. मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेसने हा गोंधळ उडवून दिला आहे. काँग्रेसने मैदानात उतरवलेले हे राणे नक्की आहेत तरी कोण याची जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

हेही वाचा -ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?

कणकवली देवगड मतदार संघातून काँग्रेसने सुशिल राणे यांना मैदानात उतरवले आहे. सुशिल राणे हे दिवंगत माजी आमदार अमृतराव राणे यांचे सुपुत्र. अमृतराव राणे हे काँग्रेसचे जुने निष्ठावान कार्यकर्ते. १९८० साली त्यांनी देवगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. तेंव्हाची निवडणूक त्यांनी लोकवर्गणी काढून लढविली होती. त्या आधी त्यांनी देवगडचे तालुका पंचायत समितीचे सभापतीपद ही भूषवले होते. देवगड शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी त्यांनी संभाळलेली होती. सुशिल राणे ही सध्या सामाजिक कार्यातून कार्यरत आहेत.

साधी राहणी, दांडगा जनसंपर्क, कामाचा प्रचंड उरक, तालुक्यातल्या प्रश्नांची जाण, प्रशासनावर पकड, तालुक्यातील सामान्य लोकांशी प्रस्थापित केलेले संबंध यामुळे अमृतराव राणे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र १९८५ मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आले. मात्र त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता ते प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम अखेरपर्यंत केले. २०१५ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमृतरावांचे कार्य ज्यांनी पाहिले होते त्या जुन्या माणसांनी, चाकरमन्यांनी राणे कुटुंबियांवर काँग्रेसने अन्याय केला अशी भावना बोलून दाखवली होती. यंदा म्हणजे म्हणजे तब्बल ३५ वर्षांनी काँग्रेसने आपली चुक सुधारण्याचा प्रयत्न केलाय. अमृतरावांचे चिंरजीव सुशिल राणे यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारीच नव्या राणेंवर दिली आहे.
कणकवली देवगड विधानसभा मतदार संघात नितेश राणे विरूद्ध सुशिल राणे ही लढत रंगतदार होईल. शिवसेनेच्या सतिश सावंत यांच्या उमेदवारीने इथली लढत तिरंगी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details