महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, कार्यक्रमादरम्यान नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक

या विमानतळाचे उद्घाटन झाले खरं पण विमान कधी उतरणार आणि उडणार? असा सवाल करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांना धारेवर धरले.

उद्घाटन करताना मुख्यमंत्री

By

Published : Mar 6, 2019, 1:50 AM IST

सिंधुदुर्ग -चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला आलेल्या नारायण राणे यांनी या टर्मिनल उद्घाटनावरून पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यासह उपस्थित नेत्यांना कोपरखळ्या मारल्या.

उद्घाटन करताना मुख्यमंत्री

या विमानतळाचे उद्घाटन झाले खरे पण विमान कधी उतरणार आणि उडणार? असा सवाल करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांच्यावर टिका केली. मात्र, राणेंच्या याच टिकेला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्यांच्याच शब्दात उत्तर दिले.

गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर, काम देखील करतो असा टोला लगावला. या दोघांच्या टिकेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील मिश्कील भाषण केले. नारायण राणे यांचे स्वप्न पालकमंत्री दीपक केसरकर पूर्ण करत असल्याचे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या टिकेवर जोरदार टोला लगावला.

दरम्यान, या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details