महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग अवैध वाळू व्यावसायिकांची दहशत, जिल्हाधिकाऱ्यांच्या चालकावर हल्ला

अवैध वाळूचे डंपर पकडून देण्यासाठी टिप देत असल्याच्या रागातून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहन चालक महेश झालबा यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Sindhudurg Terror of Illegal Sand Professionals
सिंधुदुर्ग अवैध वाळू व्यावसायिकांची दहशत

By

Published : Feb 9, 2020, 4:25 PM IST

सिंधुदुर्ग -वैध वाळू चे डंपर पकडून देण्यासाठी टिप देत असल्याच्या रागातून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहन चालकावर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी संदेश गंगाराम बागवे (२५ रा अणाव वेशीवाडी ) साईराज दयानंद अणावकर (२२ ,रा.पणदूर तिठा) अमेय अंकुश सावंत (३२ रा डीगस ) गजानन देवानंद पवार (२६ रा हुमरमळा) अक्षय प्रकाश सावंत (२८ रा किनळोस,हिर्लोक ) यांच्यावर ओरोस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश झालबा असे हल्ला झालेल्या चालकाचे नाव आहे.

सिंधुदुर्ग अवैध वाळू व्यावसायिकांची दहशत

शुक्रवार १० जानेवारीला जिल्हाधिकारी कुडाळ हुन ओरोसला येत असताना रात्रौ १०.४५ च्या सुमारास कुडाळ येथील परुळेकर हॉस्पिटल समोर वाळूने भरलेला डंपर (MH 07 C 6339 ) आढळून आला. हा डंपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थानी सोडून चालक महेश आपल्या दुचाकीने हुमरमळा येथील आपल्या घरी परतले असता आपल्या घरासमोर संदेश बागवे उभा असलेला दिसला. त्याला महेश यांनी इथे का उभा आहेस? अशी विचारणा केली व ते आपल्या घरात आले. त्यानंतर रात्री ११.४५ च्या सुमारास महेश झालबा यांना घरासमोर मोठं मोठ्याने कुणीतरी ओरडत असून घराच्या दरवाज्यावर दगड व लाथा मारत असल्याचे ऐकू आले. त्यांनी दरवाजा उघडून पाहीले असता संशयित आरोपी शिवीगाळ करत घरात घुसले व आपल्याला धक्काबुक्की करत मारहाण करून धमकी दिली असे महेश झालबा यांनी सांगीतले. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांवर कलम ३३६, ३३२, ४५२, ३५३,१४३, १४८, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अवैध वाळू व्यवसाय आणि त्यातून घडणाऱ्या अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details