सिंधुदुर्ग – जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज १२३ कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह तर १२० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेले तीन रुग्ण देवगड तालुक्यातील १, कणकवली तालुक्यातील १, मालवण तालुक्यातील १ आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. त्यापैकी ७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्या जिल्ह्यात ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्गात दोन नव्या रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण संख्या 56 वर - सिंधुदुर्ग कोरोना न्यूज
जिल्ह्यात एकूण २७ हजार ५०७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ४२८ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २५ हजार ८९५ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
३० मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्त झालेल्या ३१ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २६ अहवाल निगेटीव्ह आलेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मालवण तालुक्यातील ३ आणि कणकवली तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण, वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्यातील पणदूर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेन्टमेंट झोन आहेत.
जिल्ह्यात एकूण २७ हजार ५०७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ४२८ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २५ हजार ८९५ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात १ हजार १८४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ८१० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार ५७४ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ५६ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत १ हजार ५१८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून २३६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १६४ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ४२ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये ३८ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ६ हजार १६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे पासून आज अखेरपर्यंत एकूण ५८ हजार ८२५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.