सिंधुदुर्ग- सिंधुदुर्गातील वेंगुर्ले-रेडी बंदरात लोह-खनिज नेण्यासाठी चीन येथून 'नाथन ब्रॅन्डॉन' हे 55 हजार मेट्रीक टन क्षमतेचे सिंगापूरचे जहाज रेडी बंदरात दाखल झाले आहे. त्यामुळे चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजाराबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा भारतात प्रसार होऊ नये, यासाठी चीनहून येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी राज्यसभेत दिली. देशाबाहेरून आलेल्या १५० प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कोरोना रोखण्यासाठी उपाय कडक केले आहेत.