सिंधुदुर्ग-अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात 23 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाचकोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तर जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे, यासाठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू करणार
झाराप येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिक्षण विभागाची जागा देण्यास 48 तासांत मान्यता दिली असल्याचेही उदय सामंत म्हणाले. तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे, यासाठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावे, यासाठी जनता दरबार सुरू करण्यात आला आहे. हा जनता दरबार तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मच्छिन्द्र कांबळी यांचे स्मारक 1 वर्षात पूर्ण होणार -
कुडाळ येथे उभारण्यात येत असलेले माच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक 1 वर्षात पूर्ण करणार आहे. सी.आर.झेड. बाबत ग्रामस्थांच्या मागण्या व म्हणणे याबाबत शिफारस करू. तसेच स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका असल्याचेही सामंत म्हणाले. त्यासाठी जे काही करता येईल ते करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- मुख्यमंत्री साहेब पैसं बँकेत टाका की; चिमुकलीच्या भावनिक पत्रानंतर पोलिसांनी तिची दिवाळी केली गोड