सिंधुदुर्ग- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारलेले निर्जंतुकीकरण मार्ग बंद करण्याचा निर्णय या संस्थांनी घेतला आहे. या मार्गांमुळे अलर्जी सारखे आजार पसरताना लोकांमध्ये संसर्ग वाढू शकतो, असे सांगत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने हे मार्ग बंद करण्याचे आदेश दिले होते.
सिंधुदुर्ग : 'या' कारणामुळे जिल्ह्यातील 'सॅनिटेशन टनेल' बंद करण्याचा नगरपालिकेचा निर्णय - सिंधुदुर्ग कोरोना
निर्जंतुकीकरण मार्गामुळे अलर्जी सारखे आजार पसरताना लोकांमध्ये संसर्ग वाढू शकतो. सॅनिटेशन चेंबरमधून बाहेर पडल्यावर हात धूणे गरजेचे असताना नागरिक हात धुण्यासाठी बसवण्यात आलेल्या हॅडवाॅश सेंटरचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सॅनिटेशन टनेल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत शहरात बसवण्यात आलेला निर्जंतुकीकरण मार्ग सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सॅनिटेशन चेंबरसाठी आवश्यक असणाऱ्या केमिकलचा सध्या बाजारात मोठा तुटवडा आहे. त्याशिवाय सॅनिटेशन चेंबरमधून बाहेर पडल्यावर हात धुणे गरजेचे असताना नागरिक हात धुण्यासाठी बसवण्यात आलेल्या हॅडवाॅश सेंटरचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचबरोबर शासनाचेही निर्देश असल्यामुळे सॅनिटेशन चेंबर बंद करण्याचा निर्णय वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी दिली आहे. कणकवली नगरपंचायतीने शहरातील मुख्य चौकात निर्जंतुकीकरण मार्ग बनविला होता. हा मार्गही बंद करण्यात आला आहे.