महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक-एन्ड लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते झाले निर्मनुष्य - Sindhudurg latest news

ग्रामीण भागातील रस्ते ही निर्मनुष्य झाले असून लोकांनी ही घरीच थांबणे पसंद केले आहे. सिंधुदुर्गात ही गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांसह लोकांनी लॉकडाऊन पाळून सहकार्य केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

सिंधुदुर्ग लॉकडाऊन
सिंधुदुर्ग लॉकडाऊन

By

Published : Apr 10, 2021, 5:18 PM IST

Updated : Apr 10, 2021, 9:30 PM IST

सिंधुदुर्ग - राज्य सरकारने पुकारलेल्या विक-एन्ड लॉकडाऊनला सिंधुदुर्गवासीयांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला असून जिल्ह्यात कडक बंद पाळण्यात आला आहे. नेहमीची गर्दीची ठिकाणे निर्मनुष्य झाली असून औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शहरी बाजारपेठांमध्ये पोलीस ठिकठिकाणी तैनात असून अत्यावश्यक कामाशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसून येत होते.

ग्रामीण भागातही रस्ते निर्मनुष्य

ग्रामीण भागातील रस्ते ही निर्मनुष्य झाले असून लोकांनी ही घरीच थांबणे पसंद केले आहे. सिंधुदुर्गात ही गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांसह लोकांनी लॉकडाऊन पाळून सहकार्य केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठांमध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः बंद आहेत. हे विक-एन्ड लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी नाक्या नाक्यावर पोलीस वाहनांची कसून तपासणी करत आहेत.

हॉटस्पॉट असलेल्या कणकवलीत पोलिसांचे पेट्रोलिंग

कणकवली हा जिल्ह्यातील पहिल्यापासून कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला तालुका आहे. सध्या या ठिकाणी दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. दरम्यान, या विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर व सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे कणकवली शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन पेट्रोलिंग करत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. या आवाहनाला नागरिकदेखील उस्फूर्तपणे पाठिंबा दर्शवताना दिसत आहे.

विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. हॉटस्पॉट असलेल्या कणकवली शहरात आज सकाळी लॉकडाउन असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे. ओळखपत्र तपासूनच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अत्यावश्यक कामासाठी सोडले जात आहे. तसेच आज विनाकारण फिरणाऱ्या दोघांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आतापर्यंत एकूण 78 हजार 747 नमुने तपासण्यात आले

दरम्यान सद्यस्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 846 रुग्ण मिळाले. यातील 6 हजार 733 जण कोरोनामुक्त झाले. 193 रुग्णांचे निधन झाले आहे. प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये सहा ऑक्‍सिजनवर तर पाच व्हेन्टिलेटरवर आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 47 हजार 193 नमुने तपासण्यात आले. यातील पाच हजार 398 नमुने पॉझिटिव्ह होते. आज 826 नमुने घेतले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण 31 हजार 554 नमुने तपासले. पैकी दोन हजार 610 नमुने पॉझिटिव्ह होते. नवीन 137 नमुने घेतले. आतापर्यंत एकूण 78 हजार 747 नमुने तपासण्यात आले.

Last Updated : Apr 10, 2021, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details