महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

First Transgender Government Teacher : कौतुकास्पद! सिंधुदुर्गातील रिया आळवेकर ठरल्या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका - स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करण्याचा प्रवास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आळवेकर देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकिय शिक्षिका ठरल्या ( first transgender government Teacher in india ) आहे. त्यांचाच 'तो' चा 'ती' पर्यंतचा प्रवास अत्यंत रोमहर्षक आहे. प्रशासनाने त्यांचे स्वागत देखील केले. मात्र प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास प्रशासनामुळे काहीसा सूकर झाला ( Struggling journey from Praveen to Rhea ) आहे.

Riya Alvekar
रिया आळवेकर

By

Published : Aug 5, 2022, 5:39 PM IST

सिंधुदुर्ग -सिंधुदुर्गजिल्हा पर्यटन क्षेत्रात जगात प्रसिद्ध ( Sindhudurg district ) आहे. तो शिक्षणातही अग्रेसर आहे. पण आता एक वेगळी आदर्शवत क्रांती घडली आहे. रिया आळवेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकिय शिक्षिका ठरल्या ( first transgender government Teacher in india ) आहे. त्यांचाच 'तो' चा 'ती' पर्यंतचा प्रवास अत्यंत रोमहर्षक आहे. प्रशासनाने त्यांचे स्वागत देखील केले. मात्र प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास प्रशासनामुळे काहीसा सूकर झाला ( Struggling journey from Praveen to Rhea ) आहे.

अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी घुसमट -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ( Sindhudurg District ) तुळसुली गावातील प्रवीण वारंग यांना लहानापासून शिक्षणात आवड होती. त्यांच्या काकीने त्यांना अध्यापक अर्थात शिक्षक बनायला सांगितले. त्यामुळे प्रवीण शिक्षक बनला. प्राथमिक शाळेपासून ते डीएडपर्यंत शिक्षण घेत असताना आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना प्रवीणच्या मनात खदखदत होती. लहान असल्याने घरात सांगू शकत नव्हते. मात्र मनाची कायम घुसमट होत होती. जसजसे वय वाढत जात होते तसतसे आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना अधिक दृढ होत होती ( feeling of being woman and not a man ). मात्र त्यांनी स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करत प्रवीणपासून रिया आळवेकर असा प्रवास केला ( journey of creating own identity ) .

रिया आळवेकर

अस्तित्त्व निर्माण करण्याची इच्छा -शिक्षण घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवीण शिक्षक म्हणून कार्यरत झाला. लहानपणीच आपण आपले काहीतरी बनून अस्तित्त्व निर्माण करायचं, या उद्देशाने त्यांनी शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात करिअर सुरु केलं. मात्र मनात एकच खदखद होती ती आपण पुरुष नसून स्त्री असल्याची. मनात होणारी ही घुसमट त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना सांगितली. त्यानंतर प्रशासनाने त्यांना योग्य ती मदत केली.

2019 मध्ये प्रवीणची रिया बनली -प्रवीण यांनी 2019 मध्ये आपली सर्जरी केली. त्यानंतर देखील त्यांनी पुरुषी वेशात आपलं अध्यापनाचे काम सुरु ठेवलं. मे 2022 मध्ये त्यांनी आपण तृतीयपंथी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. त्यात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलं. प्रवीणची रिया आळवेकर झाली आणि देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान देखील मिळवला. मात्र हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता.

अखेर मनातील घूसमट, खदखद दूर झाली -लहानपणापासून चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात पावलोपावली बदल जाणवत होते. मात्र जन्म झाला तेव्हा घरातले मुलगा झाला म्हणून खुश होते. मात्र जेव्हा मला आपण पुरुष नसून स्त्री असल्याच्या भावना समजत होत्या त्यावेळी मी कुणालाही सांगू शकत नव्हते. त्यामुळे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहून आपण आपलं अस्तित्त्व सिद्ध करायचं ठरवलंआणि आज प्रवीणची रिया आळवेकर झाली. शिक्षण घेऊन शिक्षक बनून गेली दहा वर्षे त्या मुलांना शिक्षण देत आहेत. दहा वर्षांनतर प्रवीणने लहानपनापासून होणारी घुसमट, मनातील खदखद सर्जरी करुन दूर करत देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान मिळवला.

देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका -देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका असल्याचा आज अभिमान आहे. यासाठी मला माझं कुटुंब तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य केले. असल्याचे त्या सांगतात. आज रिया आळवेकर या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका असल्या तरी देखील काही तांत्रिक बाबी लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या इथे स्वीय सहाय्यक म्हणून तात्पुरतं काम पाहत आहेत.



हेही वाचा -congress agitation : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details