सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज मालवण किल्यावर शिवजयंती निमित्ताने शिवसेना-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मालवनमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राणे यांच्यातील वाक्युद्धामुळे दोन्ही गटात तणावाचे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग मालवणमध्ये भाजप-सेना येणार आमने-सामने; पोलीस बंदोबस्त कडक
जिल्ह्यात आधीच खासदार विनायक राऊत विरुद्ध माजी खासदार निलेश राणे यांच्यातला वाद तापलेला आहे. त्यातच आज शिवजयंती निमित्त मालवण किल्ल्यावर शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमनेसामने येण्याची स्थिती आहे. त्यामुळेच पोलिसांनी राजकीय संभाव्य राजकीय संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेतली आहे.
सिंधुदुर्गात वातावरण तापले-

हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्यावर 144 कलम लागू करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतोय ठाकरे सरकारमध्ये हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मालवणमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात
जिल्हा पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या मालवण किल्ला जेठीवर तैनात करण्यात आल्या आहेत. तर किल्ल्यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.