चिखलफेक प्रकरण; नितेश राणेंसह १८ आरोपींना दुपारी कणकवली कोर्टात हजर करणार ! - workers
अभियंत्याला मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणेंसह १८ जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नितेश राणे यांनी गुरुवारी एका अभियंत्याच्या अंगावर चिखलफेक करुन धक्काबुक्की केली होती.
नितेश राणे
कणकवली- अभियंत्याला मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणेंसह १८ जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात तसेच न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक निमित्त गोयल कणकवलीत दाखल झाले आहेत.