सिंधुदुर्ग -शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुमारे पावणे दोन तास यावर सुनावणी सुरू असून आमदार राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी बाजू मांडताना “नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता” अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी भाजप आ. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना जामीन जिल्हा व सत्र न्यायालयातून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २८ जानेवारी रोजी आ. राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज दाखल करून घेताना न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज सकाळी ही सुनावणी सुरू झाली आहे. आ. नितेश राणे येथे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी हे सुद्धा उपस्थित असून आमदार राणे यांच्यावतीने वकील संदीप मानशिंदे, संग्राम देसाई व अन्य वकील उपस्थित आहेत. यावेळी जामीन मिळण्यासाठी बाजू मांडताना संदीप मानशिंदे यांनी “पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे ते पाहता टाडा कायदा असता तर तो सुद्धा लावला असता”, असे दिसत असल्याचे ते म्हणाले.आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल ( Nitesh Rane in Sindhudurg Court ) झाले आहेत. संतोष परब हल्ल्याच्या ( santosh parab attack case ) गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शुक्रवारी आ. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरण येत जामिनासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार असून नितेश राणे हे याकरीता जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. दरम्यान नितेश राणे त्यांच्या खासगी सचिव राकेश गणपती पोलिसात हजर झाले आहे. नितेश राणे यांना अटक होणार की दिलासा मिळणार याचा थोड्याच वेळात निकाल लागणार आहे.
जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु
- भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या फेरविचार याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू
- आमदार नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदें करताहेत युक्तिवाद
- सरकारी वकील प्रदीप घरत हे मांडणार पोलिसांची बाजू
- संबंधित घटनेचे तपासी अंमलदार कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर न्यायालयात हजर
- नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. उमेश सावंत, अॅड. राजेश परुळेकर हे देखील न्यायालयात हजर
- न्यायाधीश आर बी रोटे यांच्या न्यायालयात सुनावणी आहे सुरू
नितेश राणेंच्या पीएची बंद खोलीत चौकशी -
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा खासगी सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलिसांना शरण आला आहे. कणकवली पोलीस त्याची बंद खोलीत चौकशी करत आहेत. जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर 2021 रोजी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पुणे येथील सचिन सातपुते नामक आरोपीला अटक करण्यात आली होती. हा संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले. सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परब याचे 38 कॉल रेकॉर्ड आढळून आले, या पार्श्वभूमीवर या हल्ल्याप्रकरणी राकेश परब याचा सह आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. सरकार पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी जिल्हा न्यायालयात राकेश परब यांच्या कॉल रेकॉर्डचे डिटेल्स सादर केले होते. राकेश परब हा घटना घडल्यानंतर फरारी होता. त्याचा कणकवली पोलिस शोध घेत होते. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश परब याने धाव घेतली होती, मात्र जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान सोमवारी राकेश परब कणकवली पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी चौकशी केली.
नितेश राणे यांच्या सोबत निलेश राणे -
आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. आ. नितेश राणेंच्यावतीने युक्तिवाद करण्यासाठी मुंबईतील ख्यातनाम वकील सतीश मानशिंदे जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. जिल्हा न्यायालयात त्यासोबत अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. उमेश सावंत, अॅड. राजेश परुळेकर हे देखील उपस्थित आहेत. तर सरकार पक्षाच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रदीप घरत हे युक्तिवाद करणार आहेत. घरत देखील जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत.
फेटाळला होता अटकपूर्व जामीन -