महाराष्ट्र

maharashtra

निसर्ग चक्रीवादळामुळे तळाशील समुद्र किनारी लाटांसोबत आला कचरा

By

Published : Jun 7, 2020, 9:52 PM IST

Updated : Jun 7, 2020, 10:15 PM IST

मालवण तळाशील समुद्र किनारा हा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्र बिंदू आहे. कोरोनामुळे पर्यटक कमी झाले असले तरी स्थानिकांचा या किनारी वावर असतो. अलीकडेच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आहे.

Sindhudurg waste news
चक्री वादळामुळे तळाशील समुद्र किनारी लाटांसोबत आला कचरा

सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. या वादळामुळे समुद्रातील कचरा किनारी भागात मोठ्याप्रमाणात आलेला दिसतो आहे. मालवण तालुक्यातील तळाशील समुद्र किनारी असा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला दिसतो.

निसर्ग चक्रीवादळामुळे तळाशील समुद्र किनारी लाटांसोबत आला कचरा

मालवण तळाशील समुद्र किनारा हा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्र बिंदू आहे. या किनारी आनंद लुटण्यासाठी आणि कासव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. कोरोनामुळे पर्यटक कमी झाले असले तरी स्थानिकांचा या किनारी वावर असतो. अलीकडेच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आहे. या कचऱ्यासोबतच समुद्रातील तेल तवंग किनारी आला असून तो वाळूत मिसळला आहे. या तवंगामुळे येथील वाळू चिकट झाल्याचे दिसून येते. समुद्रातील प्रदूषण आणि समुद्रात वाढणारा कचरा यामुळे किनारी भाग अस्वच्छ होताना दिसत आहेत.

Last Updated : Jun 7, 2020, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details