सिंधुदुर्ग - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचे घोषित केले.
नारायण राणेंचा 'स्वाभिमान' अखेर भाजपमध्ये विलीन - narayan rane on bjp
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याचे घोषित केले.
हेही वाचा -दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध
यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कोकणातील नागरिकांचे हित मी नेहमी पाहत आलो आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आज काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.